पैसे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून खरेदी केले चार आयफोन

0
352

चिंचवड, दि. २५ (पीसीबी) – चार आयफोन खरेदी करून त्याचे पैसे एनईएफटी द्वारे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 22 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेपाच वाजताच्या कालावधीत व्हीनस डेटा प्रा ली चिंचवड या दुकानात घडला.

संजय सार्थक नावाच्या ग्राहकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशांत सुनील गुजर (वय 36, रा. लोहगाव, पुणे) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या स्टोअर मध्ये असताना आरोपी संजय सार्थक ग्राहक बनून स्टोअर मध्ये आला. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून चार नवीन आयफोन खरेदी केले. त्याचे पैसे कंपनीच्या बँक खात्यावर एनईएफटीद्वारे पाठवतो असे सांगून त्याने पाच लाख 99 हजार 600 रुपये कंपनीच्या खात्यावर पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट फिर्यादींना दाखवला. मात्र कंपनीच्या खात्यात पैसे आले नसल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.