पैशासाठी मुलीने मित्राच्या सोबतीने केला आईचा खून

0
180

दि 9 एप्रिल (पीसीबी )- पुण्यात एका मुलीने पैशांसाठी आपल्या आईचा मित्राच्या मदतीने खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या नंतर मुलीने आईच्या मृत्यूचा बनाव देखील रचला. वडगाव शेरी येथे पैशांसाठी मुलीने तिच्या मित्रासोबत आईच्या डोक्यात हातोडा मारून आणि उशीने तोंड दाबून खून केल्याची घटना आज सकाळी उघकडीस आली. या नंतर घसरून पडल्याने आईचा मृत्यू झालाच बनाव मुलीने रचला. मात्र, नातेवाईकांनी संशय व्यक्त करून पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिल्यावर या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात मुलीवर व तिच्या मित्रावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगल संजय गोखले (वय ४५, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) असे खून झालेल्या आईचे नाव आहे. तर यश मिलिंद शितोळे (रा. गणेशनगर, वडगावशेरी) आणि योशिता संजय गोखले (वय १८, रा. राजश्री कॉलनी, वडगाव शेरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी विनोद शाहू गाडे (वय ४२, रा. गोवंडी, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.

या घटनेचे वृत्त असे की, योशिता ही मंगल गोखले यांची मुलगी असून तिचे काही दिवसांपूर्वी टीच्या मित्राच्या मदतीने मंगल यांच्या बँक खात्यामधून त्यांना न सांगता परस्पर पैसे काढले. दरम्यान, हा प्रकार आईला कळला तर ती रागवेल या भीतीने तिने थेट आईच्या खुनाचा कट रचला. या साठी तिने तिचा मित्र यश शीतोळे याला घरी बोलावत त्याला घरातील हातोडा दिला.

दरम्यान, मंगल या घरात त्यांच्या खोलीत झोपल्या होत्या. यावेळी झोपलेल्या मंगल यांनी आवज करू नये या साठी योशिताने मंगल यांचे तोंड स्कार्फने दाबले. तर याच वेळी यशने मंगल यांच्या डोक्यात हातोड्याने मारून त्यांचा खून केला. दरम्यान, या गुन्हाचा सापडू नये यासाठी त्यांनी आई मंगल या बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्याचा बनाव रचला. तसेच मंगल यांचा मृत्यू झाल्याची माहिती तिने नातेवाईकांना दिली. मात्र, मुलीच्या बोलण्यावरून मंगल यांच्या बोलण्याबाबत नातेवाईकांना शंका आली. त्यांनी घेत या बाबत चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.