पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव दरोडा विरोधी पथकाने उधळला

0
555

वाल्हेकरवाडी, दि. ८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने वाल्हेकरवाडी-रावेत रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव उधळून लावला. ही कारवाई सोमवारी (दि. 6) रात्री पावणे अकरा वाजता करण्यात आली.

करणसिंग राजपूतसिंग दुधाणी (वय 25, रा. हडपसर), अनिल बच्चन टाक (वय 29, रा. ओटास्किम निगडी), जितसिंग राजपालसिंग टाक (रा. हडपसर), अक्षयसिंग उर्फ डिचक्या टाक (रा. हडपसर), लखनसिंग रजपूतसिंग दुधाणी (रा. हडपसर) यांच्या विरोधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील करणसिंग आणि अनिल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोमवारी रात्री एका सॅन्ट्रो कार (एम एच 43 / ए 4755) मधून आले. ते वाल्हेकरवाडी-रावेत रोडवर असलेल्या भारत पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार होते. याबाबत दरोडा विरोधी पथकाला माहिती मिळाली. त्यांनतर पोलिसांनी सापळा लावून आरोपींचा हा डाव उधळून लावला. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली.

आरोपींकडून एक बोअर कटर, दोन स्क्रू ड्रायव्हर, एक कोयता, दोन लोखंडी कटावणी असे दोन लाख तीन हजार 500 रुपयांचे साहित्य जप्त केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.