पेटीएम केवायसीच्या बहाण्याने फसवणूक

0
245

चऱ्होली, दि. ८ (पीसीबी) – पेटीएमची केवायसी करायची आहे सांगून ओटीपी घेत 49 हजार रुपये उकळ्यालाचा प्रकार चऱ्होली येथे 19 सप्टेंबर रोजी घडला आहे.

याप्रकरणी सुरेश रावजी म्हसे (वय 57 रा. चऱ्होली) यांनी रविवारी (दि.8) फिर्याद दिली असून मोबाईल नंबर 7657026296, 9693870976 व 8097716311 या मोबाईल क्रमांक धारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या फोनवर अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मॅसेज आला की पेटीएम खात्याची केवायसी करायची आहे, त्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा, फिर्यादी यांनी लिंक ओपन करताच पेटीएम अप्लीकेशन ओपन झाले, तिथे त्यांनी ओटीपी मागितला,फिर्यादी यांनी ओटीपी टाकताच त्यांच्या खात्यातून 49 हजार रुपये काढून घेण्यात आले. यावरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.