पॅरामेडिकल क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे नवे पाऊल…!

0
90

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), मोरया सामाजिक प्रतिष्ठान आणि लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बजाज फिन्सर्व यांच्या अर्थसहाय्याने मोफत पॅरामेडिकल प्रशिक्षण “पॅरामेडिकल करिअर 2.1 – पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण, युवा पिढीसाठी आत्मनिर्भरतेचे एक नवीन पाऊल” या विषयावर आधारित कौशल्य विकास व पॅरामेडिकल प्रशिक्षण शैक्षणिक सत्राचे उद्घाटन संपन्न झाले.
या प्रसंगी आमदार शंकर भाऊ जगताप, बार्टी चे महासंचालक सुनील वारे (IRRS ) बार्टी चे कौशल्य विकास विभागाचे प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे . बार्टी ऑफिस सुप्रीडेंट प्रज्ञा मोहिते मॅडम, बार्टी चे प्रकल्प संयोजक महेश गवई, SOS संथेचे धीरज कुलकर्णी डॉ सरोज अंबिके, डॉ राखी झोपे, आरती विभुते, संतोष चव्हाण, विविध हॉस्पिटल चे संचालक उपस्थित होते

या प्रसंगी मा आमदार शंकर जगताप म्हणाले या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून बजाज फिनसर्व अर्थ सहाय्याने युवक-युवतींना पॅरामेडिकल क्षेत्रातील अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण मिळणार असून, आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देत समाजाला सक्षम व कौशल्यसंपन्न पिढी घडविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहेअसे सांगितले

संस्थेचे अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांनी प्रस्तावना केली आणि संस्थेच्या वतीने ४०० युवा विद्यार्थी यांना बजाज फिनसर्व यांच्या सहकार्याने लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज येथे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे व त्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोग्यम या उपक्रमाचे व इतर विविध उपक्रम यांची माहिती दिली या प्रसंगी विद्यार्थ्याना त्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले

मेघना ठाकूर यांनी आभार मानले व नितीन साळी यांनी संयोजन केले