नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) – केंद्र सरकारने पॅन सोबत आधार कार्डला लिंक करण्याची डेडलाइन वाढवली आहे. आता ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला जवळपास तीन महिन्याची मुदतवाढ मिळाली असून या दरम्यान तुम्ही पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करू शकता. आधी ३१ मार्च २०२३ पर्यंत लिंक करण्यासाठी डेडलाइन ठरवली होती. केंद्र सरकारकडून यावेळी मुदतवाढ मिळणार नाही, असे म्हटले जात होते. परंतु, आता ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
तुम्हाला जर तुमचे पॅन कार्ड आधार कार्डचे स्टेट्स चेक करायचे असेल तर सर्वात आधी तुम्हाला
UIDAI च्या अधिकृत सरकारी वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जाणे गरजेचे आहे.
येथे गेल्यानंतर आधार सर्विसेजचा मेन्यू तुम्हाला दिसेल. यावर क्लिक करा. त्यानंतर स्टेट्सवर क्लिक करा.
या ठिकाणी तुम्हाला तुमचा पॅन कार्डचा नंबर टाकावे लागेल. त्या ठिकाणी असलेला कॅप्चा कोड टाकावा लागेल.
या नंतर पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिकिंगचे स्टेट्स चेक करण्यासाठी Get Linking Status वर क्लिक करणे गरजेचे आहे. या नंतर तुम्हाला अवघ्या काही मिनिटामध्ये लिंकिंगची माहिती मिळू शकते की, तुमचे पॅन कार्ड आधार कार्डला लिंक झाले की नाही.