पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक

0
171

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी)- पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने अनोळखी व्यक्तीने एका व्यक्तीची दोन लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार दोन मार्च रोजी श्रीधरनगर, चिंचवड येथे घडला.

रितेश तिलकराम बोहरे (वय 43, रा. श्रीधरनगर चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8987515891 या मोबाईल क्रमांक धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यक्तीने फिर्यादी यांना एक लिंक पाठवली. त्या लिंक मध्ये फिर्यादी यांचे पॅन कार्ड अपडेट करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी पॅन कार्ड अपडेट केले असता त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख रुपये आरोपीने काढून घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.