पृथ्वीराज चव्हाण यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभाव होणार

0
456

पुणे, दि. २० (पीसीबी) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पराभाव होणार असल्याचा अंदाज एका सर्व्हेमध्ये वर्तविण्यात आला आहे. ‘न्यूज एरिना इंडिया’ या राजकीय संस्थेने हा सर्व्हे केला आहे. कर्नाटकमधील अचूक सर्व्हेमुळे ही सर्वेक्षण संस्था चर्चेत आली होती. या सर्व्हेनुसार कराड दक्षिण या चव्हाण यांच्या मतदारसंघातून भाजप बाजी मारणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या जागेवर भाजप नेते पंढरपूरच्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे माजी अध्यक्ष अतुल भोसले उमेदवार असण्याचे शक्यता आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मतदारसंघ मानला जातो. 1962 पासून इथे एकदाही काँग्रेसचा पराभव झालेला नाही. दिवंगत काँग्रेस नेते विलासकाका उंडाळकर हे इथून तब्बल 7 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2014 च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण सुरक्षित जागेच्या शोधात होते, तेव्हा त्यांनी या जागेवरून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले.त्यानंतर 2019 मध्ये चव्हाण 9 हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. भाजपच्या अतुल भोसले यांनी त्यांना कडवी लढत दिली होती. आता मात्र 2024 मध्ये अतुल भोसले विजयी होण्याचा अंदाज आहे.

या सर्व्हेनुसार साताऱ्यातील 8 पैकी भाजप 2 आणि राष्ट्रवादी 6 जागांवर विजयी होणार आहे.
फलटण (SC): राष्ट्रवादी
वाई : राष्ट्रवादी
कोरेगाव : राष्ट्रवादी
माणूस : राष्ट्रवादी
कराड उत्तर : राष्ट्रवादी
कराड दक्षिण : भाजप
पाटण : राष्ट्रवादी
सातारा : भाजप (अत्यंत तगडा उमेदवार)