पूर्व वैमानस्यातून तिघांना मारहाण

0
165

निगडी, दि. 11ऑगस्ट (पीसीबी) -जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 9) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास निगडी येथे घडली.

शरद संतोष शेलार (वय 20, रा. साईनाथ नगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळू रोकडे, ओमकार रोकडे, दोन महिला आणि ओमकार रोकडे याचा मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी मधील इन्स्पिरिया मॉल जवळ फिर्यादी शरद शेलार यांची वडापाव सेंटर व चहाची टपरी आहे. तर आरोपींची अंडाभुर्जीची हातगाडी आहे. दोघांची दुकाने शेजारी आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी, त्यांची आई आणि बहीण यांना बेदम मारहाण केली. मारहाण करून आरोपी पळून गेले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.