पूर्व वैमानस्यातून तरुणावर कोयत्याने वार

0
256

पिंपळे गुरव, दि.४ (पीसीबी) -पूर्ववैमानस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी (दि. 3) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पवनानगर पिंपळे गुरव येथे घडली.

राहुल सुनील मोरे (वय 23, रा. पवनानगर, पिंपळे गुरव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अथर्व शशिकांत देशपांडे (रा. पवनानगर, पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मोरे हे त्यांच्या मित्रांसोबत गप्पा मारत पवनानगर येथील सार्वजनिक रस्त्यावर थांबले होते. त्यावेळी आरोपी अथर्व देशपांडे तिथे आला. त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून राहुल यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर राहुल यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.