पूर्ववैमानस्यातून दोघांना बेदम मारहाण

0
371

मोशी, दि. ६ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. यामध्ये दोघेजण जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास बोऱ्हाडे वस्ती मोशी येथे घडली.

विकास कुमार तारकेश्वर राम (वय 20, रा . बोऱ्हाडे वस्ती मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुस्तकीन खान आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खान याचे फिर्यादी यांच्याशी मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून खान याने त्याच्या दोन साथीदारांसोबत येऊन फिर्यादी यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्याचबरोबर फिर्यादी यांचा चुलत भाऊ पिंटू कुमार याला देखील लोखंडी रॉड आणि फायबरच्या पाईपाने मारून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.