पूर्ववैमानस्यातून तरुणाला बेदम मारहाण

0
67

सांगवी, दि. 11 (पीसीबी) –

जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 10) दुपारी दोन वाजताच्या सुमारास गंगोत्री नगर पिंपळे गुरव येथे घडली.

सुरेश शामराव माने (वय 24, रा. जुनी सांगवी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन अर्जुन जाधव (वय 22), सचिन अर्जुन जाधव (वय 25), भावड्या जाधव, अर्जुन हनुमंत जाधव (वय 50, सर्व रा. पिंपळे गुरव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुरेश माने आणि आरोपी यांचे पूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी सुरेश यांना शिवीगाळ करून लाथा बुक्क्याने व लाकडी दांडक्याने पाठीत, हातावर, डोक्यात मारून जखमी केले. तू जर कोणाला सांगितले तर तुला मारून टाकीन, अशी आरोपींनी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.