पूर्ववैमानस्यातून तरुणाला कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण

0
201

झालेल्या भांडणाचा राग मनात धरून चौघांनी एका 28 वर्षीय तरुणाला कोयत्याने मारहाण करत मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी (दि.23) दुपारी तळवडे येथे घडली.

याप्रकरणी सुनील धनराज पाटील (वय 28 रा. तळवडे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी कुंदन थोरात,दीपक शेलार, अनिकेत विटकर, सुरज कोळी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुंदन याने जुन्या झालेल्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या डोक्यात लाकडी फळीने मारहाण केली. तर अनिकेत विटकर याने कोयत्याने लाकडी दांडक्याने व बेल्ट ने मारहाण करत फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी आरोपींवर कुणाच्या प्रयत्नाचा तसेच बेकायदा शस्त्र वापरल्याचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.