पूर्ववैमानस्यातून तरुणावर कोयत्याने वार

0
873

दिघी, दि. २८ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्यास गंभीर जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास दत्तनगर चौपाटी दिघी येथे घडली.

गौरव बळीराम शेवाळे (वय 30, रा. शास्त्री चौक, आळंदी भोसरी रोड, दिघी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम संदीप सोनवणे (वय 23, रा. आदर्श नगर, दिघी) आणि त्याच्या इतर तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गौरव हे दत्तनगर चौपाटी येथे अंडे का बादशहा भुर्जी का शहेनशहा नावाच्या अंडा भुर्जीच्या गाडीवर काम करतात. शुक्रवारी रात्री काम करत असताना त्यांच्या ओळखीचा आरोपी शुभम सोनवणे हा त्याच्या इतर तीन साथीदारांसोबत अंडा भुर्जीच्या गाडीवर आला. त्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून गौरव यांना दगडाने, कोयत्याने, लोखंडी पट्टीने आणि लाथांनी मारहाण करून जखमी केले. मारहाण करून जात असताना आरोपींनी गौरव यांना ‘तू लायकीत राहायचे नाही तर आता ट्रेलर दाखवला आहे यानंतर पूर्ण पिक्चर दाखवेन’ अशी धमकी देत हवेत कोयता फिरवत ‘लाल्या भाऊ सोबत पंगा नाही घ्यायचा’ अशी धमकी देत निघून गेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.