पूर्ववैमनस्यातून मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

0
626

भोसरी, दि. २८ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना मारहाण केल्या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी अंकुशराव लांडगे सभागृह भोसरी येथे घडली.

बिरेंदर चंद्रदेव चव्हाण (वय 54, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोहित सादाराम बारेक, इस्लाम शेख, एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहित आणि इस्लाम यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी फिर्यादी यांचा मुलगा सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेला असता तिथे आरोपींसोबत त्यांचा किरकोळ वाद झाला. त्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला बेदम मारहाण करून जखमी केले. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेले असता आरोपींनी फिर्यादी यांना देखील शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.