पूर्ववैमनस्यातून दोघांची हाणामारी; परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
532

रहाटणी, दि. ७ (पीसीबी) – मागील वर्षी झालेल्या वादातून दोघांमध्ये बेदम हाणामारी झाली. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी (दि. 5) सायंकाळी काळेवाडी लिंक रोड, रहाटणी येथे ही घटना घडली.

पंकज संतोष चोथे (वय 24, रा. थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पप्या गिरी (वय 30, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पंकज आणि त्यांचा अमित्र श्रवण माचरे यांनी शिफ्टने रिक्षा चालवण्यासाठी घेतली आहे. रिक्षा दुरुस्त करण्यासाठी ते काळेवाडी लिंक रोडवर असलेल्या एका गॅरेजवर गेले. तिथे आरोप पप्या त्याच्या दोन मित्रांसह दारू पीत होता. पप्याने पंकज यांना हाक मारून बोलावून घेतले. मागील वर्षी झालेल्या भांडणाच्या रागातून वाद घालून पुन्हा मारहाण केली. पप्या आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादीस मारहाण केली. तसेच फोन करून आणखी साथीदारांना बोलावून घेतल्याचे पंकज यांनी ऐकले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याच्या परस्पर विरोधात गिरीश दीपक मनवे उर्फ पप्पू गिरी (वय 28, रा. सानेचौक, चिखली) यांनी फिर्याद दिली असून पंकज संतोष चोथे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे काळेवाडी लिंक रोडवर असलेल्या एका गॅरेजजवळ थांबले असता आरोपी तिथे आला. मागच्या वर्षी मला मारले होते. तुला आठवते का, असे म्हणत आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. तिथे पडलेला दगड फिर्यादीस फेकून मारला. तो दगड फिर्यादी यांनी हुकवला. दगड लागल्यास फिर्यादी यांचा मृत्यू होऊ शकतो, हे माहिती असताना आरोपीने दगड मारला. त्यानंतर मोठमोठ्याने आरडाओरडा केला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास वाकड पोलीस करीत आहेत.