पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण; एकास अटक

0
400

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना 7 सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आझाद कॉलनी नंबर एक समोर, काळेवाडी येथे घडली.

अजय रमेश सगर (वय 25, रा. काळेवाडी, पुणे. मूळ रा. सरकोली, पंढरपूर, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरण सत्यम अनिल भारंबे (वय 22, रा. काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मित्र शुभम कांबळे दुचाकीवरून तपकीर चौकाकडे जात असताना आझाद कॉलनी नंबर एकच्या समोर आरोपीने त्यांना अडवले. जुन्या भांडणाच्या रागातून त्याने फिर्यादी आणि त्यांचा मित्र शुभम यांना शिवीगाळ करून आरोपीने बेदम मारहाण केली. फिर्यादीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादींनी तो वार चुकवला. त्यानंतर आरोपीने कोयता हवेत भिरकावून आरडा ओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.