पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण

0
195

चिखली ,दि. 11(पीसीबी) –   जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिउन दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 9) दुपारी तीन वाजता साने चौक, चिखली येथे घडली.प्रतिक हनुमंत मोरे (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि अक्षय लोखंडे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. प्रतिक यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंद परदेशी, अतिश तरंगे, विकी, संकेत (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. मोरेवस्ती, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रतिक आणि त्यांचे मित्र स्वप्नील मोरे, अक्षय लोखंडे, आकाश माने असे मोरेवस्ती येथे बसले होते. तिथे आलेल्या आरोपींनी पूर्वी झालेल्या वादातून फिर्यादी प्रतिक आणि त्यांचा मित्र अक्षय यांना मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.