पूर्ववैमनस्यातून दोघांचा घेतला चावा

0
205

चिखली, दि. ११ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने तिघांना मारहाण केली. त्यातील एकाच्या कानाचा तर दुस-याच्या हाताला जोरात चावा घेऊन जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 9) रात्री साडेनऊ वाजता भीमशक्तीनगर झोपडपट्टी, चिखली येथे घडली.

प्रशांत प्रभाकर वाघमारे (वय 26, रा. भीमशक्तीनगर झोपडपट्टी, चिखली. मूळ रा. बीड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयभीम भिका भालेराव (रा. भीमशक्तीनगर झोपडपट्टी, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी राहतात. एक महिन्यापूर्वी फिर्यादी यांचे आरोपीच्या वडिलांसोबत भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून शनिवारी रात्री फिर्यादी दुचाकीवरून जात असताना आरोपीने त्यांना अडवले. माझ्या वडिलांसोबत भांडण का केले, असे म्हणत त्याने फिर्यादी यांना हाताबुक्क्याने मारहाण करून कानाला जोरात चावा घेतला. हे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी यांचा भाऊ तेजस आणि वाहिनी आले असता आरोपीने त्या दोघांनाही हाताने मारहाण केली. तेजस यांच्या हाताला चावा घेऊन त्यांनाही दुखापत केली. फिर्यादी यांच्या आई, वडिलांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.