पूर्ववैमनस्‍यातून दुचाकी जाळली

0
2

चिंचवड, दि. 18 (पीसीबी)
पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दोन जणांनी एका महिलेची दुचाकी जाळली. ही घटना सोमवारी (दि. १६) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आनंदनगर, चिंचवड स्टेशन येथे घडली.
स्वप्नील संतोष भोसले व आदित्य आवळू (दोघेही रा. आनंदनगर, चिंचवड स्टेशन) अशी गुन्हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. याबाबत 55 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये पूर्वी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून सोमवारी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपींनी आपसात संगणमत करून फिर्यादी महिलेची १० हजार रुपये किमतीची (एमएच 14 डीसी 8308) ही दुचाकी जाळून नुकसान केले. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.