पूर्ववैमनस्यातून तिघांना बेदम मारहाण, दोघांना अटक

0
176

पिंपरी, दि. १८ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून तिघांना कोयता आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री काळभोर नगर चिंचवड येथे घडली.

शाहरुख हमीदअली सय्यद (वय ३०, रा. आकुर्डी गावठाण), जाहिद सय्यद, कुमार कांबळे अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. शाहरुख यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आतिफ उर्फ आत्तूखान (वय २०, रा. चिखली), शादाब खान (वय २०, रा. काळभोर नगर, चिंचवड), चेतराज जोशी (वय ३०, रा. काळभोरनगर, चिंचवड) अन्य एकजण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आतिफ आणि त्याच्या तीन साथीदारांनी शाहरुख, त्यांचा चुलत भाऊ जाहिद आणि कुमार कांबळे या तिघांना कोयता आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. यात शाहरुख आणि त्यांचा चुलत भाऊ जाहिद हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी आतिफ आणि चेतराज या दोघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.