पिंपरी,दि. 18 (पीसीबी)
कर्नाटकमध्ये झालेल्या एका विवाह सोहळ्यात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका टोळक्याने तरुणावर खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. १४) रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास भाटनगर, पिंपरी येथे घडली.
दर्शन ऊर्फ मयुर नवले (वय २४), अंश विनोद नवले (वय २०) व त्याचे इतर पाच ते सहा साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी अंश याला अटक केली आहे. याबाबत जखमी सोनू रमेश मलकेकर (वय २५, रा. मथुरा बिल्डींग, संत ज्ञानेश्वर कॉलनी, डांगे चौक, थेरगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून याबाबत त्यांच्या २३ वर्षीय पत्नीने बुधवारी (दि. १५) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सोनू हे २३ डिसेंबर २०२४ रोजी कर्नाटक येथे नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. तिथे त्यांची आरोपी दर्शन याच्यासोबत भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास सोनू हे भाटनगर येथील बसथांब्यावर उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी शिवीगाळ करीत सुरूवातील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर आरोपी दर्शन याने आपल्याजवळील कोयत्याने फिर्यादी यांच्या कपाळावर मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच इतर आरोपींनी लाकडी बांबूने मारून जखमी केले. पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.