पूर्ववैमनस्‍यातून तरुणावर खुनी हल्‍ला

0
18

दि .7 (पीसीबी) – पूर्वी झालेल्‍या भांडणाच्‍या कारणावरून दोन एका तरुणाच्‍या गळ्यावर वस्‍तार्‍याने वार करीत जीवे मारण्‍याचा प्रयत्‍न केला. ही घटना चाकण जवळील मेदनकरवाडी येथे रविवारी (दि. ५) सकाळी पावणे सात वाजताच्‍या सुमारास घडली.

सचिन श्रीराम आरेकर (वय २६, रा. टेलिफोन कॉलणी, अमृतनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) असे खुनी हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी चाकण पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अभिषेक सोनवणे (पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) आणि ऋतिक ऊर्फ सायको रा. अमृतनगर कॉलणी, मेदनकरवाडी, ता. खेड, जि. पुणे) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी सकाळी पावणेसात वाजताच्‍या सुमारास आरोपींनी पूर्वीचे भाडणांचा राग मनात धरून फिर्यादी आरेकर यांना जिवे ठार मारण्याचा कट रचला. त्‍यानुसार आरोपी अभिषेक सोनावणे याने फिर्यादी आरेकरला फोनव्दारे संपर्क साधून ‘तुला भेटायचं आहे. प्रेमाचा चहा जवळ ये, असे सांगितले. पडवळ बंधू दुध डेअरी फार्म समोर आरोपी सायको याने फिर्यादीस पाठीमागुन मिठी मारली. त्‍यांना घट्ट पकडून ठेवले असता आरोपीसोनवणे याने आज याला सोडायचे नाही. याची विकेट टाकायची, असे बोलून जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्याच्‍या हातातील धारदार वस्ता-याने फिर्यादीचे गळ्यावर व डाव्या हाताचे अंगठ्या शेजारील बोटावर वार करून जखमी केले. तसेच फिर्यादी आरेकर यांना शिवीगाळ, दमदाटी करत जोर-जोरात आरडाओरड करून आम्ही इथले भाई आहोत, असे बोलून दहशत माजविली. ही घटना पाहून बाजूच्‍या मोबाईल शॉपी, दुध डेअरी, पान टप-याची शटर लावून घेतली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.