पूर्ववैमनस्यातून तरुणाला बेदम मारहाण

0
126

निगडी, दि. 25 (पीसीबी) : पूर्वी झालेल्या वादातून चहा पित उभ्या असलेल्या तरुणाला मोकळ्या जागेत नेऊन बेदम मारहाण केली. त्याच्या खिशातील मोबाईल आणि रोख रक्क्म देखील काढून घेतली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सकाळी दहा वाजता आकुर्डी येथील गणेश व्हिजन मागील मोकळ्या पार्किंगमध्ये घडली.

याप्रकरणी नैशाद एकेबुला शहा (वय 20, रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रिहाण कादिर खान, निसार शहा व त्याचे दोन अनोळखी मित्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मोबाईलची दुरुस्ती करण्यासाठी आकुर्डी येथील जय गणेश व्हिजन येथे आले होते. त्याठिकाणी चहा पीत असताना रिहाण खान व निसार शहा आले. त्यांनी फिर्यादीला बळजबरीने ओढत नेत जय गणेश व्हिजन पाठीमागील मोकळ्या पार्किंगमध्ये नेले. तिथे आणखी दोन मित्रांना बोलावून घेत फिर्यादीला बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने मारत गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातील मोबाईल व दोन हजार रुपयांची रक्कम काढून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.