जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 30 मे रोजी अजंठा नगर चिंचवड येथे घडली.
अंकुश शामराव कुऱ्हाडकर (वय 21, रा. अजंठानगर, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी सोनवणे, संतोष सोनवणे (दोघे रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंकुश यांचे आरोपींसोबत मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून 30 मे रोजी अंकुश हे त्यांच्या मित्रासोबत जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ‘तू आमच्या भावाला मारले होते. तुला जास्त माज आलाय का, तुला संपवतो’ असे म्हणत आरोपींनी अंकुश यांच्या डोक्यावर कोयत्याने सभासप वार केले. यामध्ये अंकुश गंभीर जखमी झाले. हे भांडण सोडवण्यासाठी अंकुश यांचा मित्र आला असता त्याला कोयता उगारून जीवे मारण्याची आरोपींनी धमकी दिली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.