पूर्ववैमनस्यातून तरुणास मारहाण

0
495

पिंपरी, दि ४ (पीसीबी)- जुन्या भांडणाच्या कारणावरून एका फळ विक्रेत्याला तिघांनी बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 2) रात्री थरमॅक्स चौक, चिंचवड येथे घडली.

यश बाळू लगाडे (वय 24, रा. निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुजल पोटभरे (वय 19), यश पोटभरे, ओंकार (पूर्ण नाव माहिती नाही, सर्व रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फळगाडी चालवतात. रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ते फळगाडी बंद करून घरी जात होते. त्यावेळी जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी, दगडाने व लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यात फिर्यादी जखमी झाले आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.