पूर्ववैमनस्यातून चिखलीत एकास मारहाण

0
1613

चिखली, दि. २९ (पीसीबी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी एका व्यक्तीला मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. २६) रात्री सव्वा नऊ वाजता गोडाऊन चौक, चिखली येथे घडली.

अशोक काळूराम मोरे (वय ३४, रा. चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय भोजने, नागेश सूर्यवंशी आणि अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांचे मित्र अक्षय भोसले, चुलत भाऊ विशाल मोरे, चुलते नाना मोरे यांच्यासोबत गोडाऊन चौक चिखली येथे गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी जुन्या भांडणाच्या कारणावरून व रिकव्हरीच्या कारणावरून वाद घालून लाकडी बांबू, कोयत्याने अक्षय भोसले यांना मारहाण जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.