पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करत खुनी हल्ला

0
329

>> चारजण गंभीर जखमी, दोघांना अटक

भोसरी, दि. १ (पीसीबी) – सहा जणांच्या टोळक्याने जुन्या भांडणाच्या कारणावरून एका कुटुंबावर खुनी हल्ला केला. कोयत्याने वार करत, बांबूने मारहाण केल्याने पती, पत्नी, मुलगा आणि मुलगी असे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि. ३०) रात्री चक्रपाणी वसाहत भोसरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

जमशेद नदाफ, त्यांची पत्नी, मुलगा इर्शाद नदाफ आणि मुलगी असे चौघेजण जखमी झाले आहेत. जैद जमशेद नदाफ (वय 18, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील पवळे व साहिल मनोवर यांना अटक केली असून त्यांच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील जमशेद नदाफ आणि आरोपी निखील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याच काराणातून निखील व साहिल त्यांच्या साथीदारांसोबत मिळून फिर्यादीच्या घरी आले. हातात कोयते फिरवून दोन दुचाकी व रिक्षाची तोडफोड केली. आरोपींनी परिसरात दहशत पसरवली, तसेच आज मी तुम्हाला सोडत नसतो. आज एकएकाला मी मारून टाकतो अशी धमकी दिली. आरोपी निखील याने जमशेद यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. भांडण सोडविण्यासाठी फिर्यादीची बहीण मध्ये पडली असता तिच्यावरही कोयत्याने वार करून जखमी केले. फिर्यादी यांचा भाऊ इर्शाद याच्या डोक्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. फिर्यादी यांच्या आईला बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.