पूर्ववैमनस्यातून एकावर सत्तूरने वार

0
288

भोसरी, दि.२४ (पीसीबी) – जून्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका तरुणावर सतूरने वार केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.23) रात्री भोसरी येथील आळंदी रोड परिसरात घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

रुपेश रमेश बैचे (वय.31 रा भोसरी) व विशाल प्रकाश भोईर (वय 21 रा भोसरी ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात प्रशांत विनायक नकाते (वय 30 रा भोसरी) यांनी फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी रुपेश यांच्यात जुने भांडण होते. या भांडणाचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी च्या पोटात सतुर ने वार केले तसेच लता बुक्क्यांनी मारहाण करत कारच्या बोनेटवर टाकत दूरवर फरपटत नेले या घटनेवरून पोलिसांनी आरोपीवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे याचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.