मुंबई, दि. 7 राज्य सरकारच्या मदती कडे आस लावून बसलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने अखेर पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा जास्तीत जास्त पैसा दिवाळीच्या आधी, शेतकऱ्यांना देता येईल, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.
राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार खरडून गेलेल्या जमीनला 47 हजार प्रतिहेक्टर मदत मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.














































