पुसणे गावात दारू भट्टीवर शिरगाव पोलिसांचा छापा

0
182

शिरगाव, दि. २८ (पीसीबी) – मावळ तालुक्यातील पुसाणे गावात ओढ्याच्या कडेला सुरू असलेल्या दारूभट्टीवर शिरगाव पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. यामध्ये एक लाख 98 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी नष्ट केला. ही कारवाई शनिवारी (दि. 27) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास करण्यात आली.

मित्तल देव राठोड (वय 21), देव राठोड (वय 22, रा. पुसाणे, ता. मावळ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार योगेश नागरगोजे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुसाणे गावात ओढ्याच्या कडेला मोकळ्या जागेमध्ये झाडांच्या आडोशाला एक दारूभट्टी सुरू असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शिरगाव पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा मारून कारवाई केली. पोलीस आल्याची चाहूल लागताच दोघेजण झाडांचा आडोसा घेऊन पळून गेले. त्यानंतर या कारवाईमध्ये शिरगाव पोलिसांनी दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित कच्चे रसायन असलेला एक लाख 98 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.