गुरुवारी ग. दि. माडगूळकर सभागृहात हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान च्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
पिंपरी, दि. २५ हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचा रौप्य महोत्सव,
शिवजयंती महोत्सव चे औचित्य साधून हिंदू स्वाभिमान दिवसानिमित्त जेष्ठ वक्ते पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांना “हिंदू कुलभूषण” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, सचिव उत्तम दंडीमे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
गुरुवारी (दि. २७ मार्च) सायंकाळी ५:३० वाजता निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृह येथे या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी “सनातन राष्ट्रवाद आणि आजचा युवा” या विषयावर पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ हे व्याख्यान देणार आहेत, तसेच राष्ट्रप्रहरी या रौप्य महोत्सवी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे भूषविणार आहेत, अशी माहिती शिवजयंती उत्सवाचे समन्वयक कैलास बारणे व खजिनदार दत्ता सूर्यवंशी यांनी दिली. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सुहास पोफळे, अतुल आचार्य, कुमार जाधव, रमेश स्वामी, दिलीप कुलकर्णी, दिगंबर रिद्धीवाडे, नामदेव शिंत्रे, विजय गुंजाळ, शिवाजी रेड्डी, ॲड. देवदास शिंदे, मनोज गोबे, मनोज बोरसे, सुरेंद्र कर्मचंदानी अलका आर्य, तेजस्विनी जटाळ आदींनी सहभाग घेतला आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यास सोहळ्यास हिंदू बंधू-भगिनींनी भगवे फेटे परिधान करून बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.