पुर्ववैमनस्यातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न, आरोपीला अटक

0
173

पुणे, दि. १९ (पीसीबी): जुन्या भांडणाचा राग मनात धरून तरुणाच्या अंगावर गाडी घालून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बुधवारी (दि.17) रात्री पुणे-मुंबई जुना महामार्गावरील मयुर हॉटेलच्या पार्किंगमध्ये घटला आहे.

विशाल बाळासाहेब मोकाशी (वय 30 रा. सांगवडे, मावळ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात महेश दिलीप लोहोर (वय 29 रा. दारुंब्रे, मावळ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्. माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी यांच्या आधी वाद झाला होता. याचाच राग मानात धरून आरोपीने त्याच्या ताब्यातील गाडी फिर्यादी यांच्या अंगावर घालून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादींना फरपटत नेले. यात फिर्यादी व त्यांचा मित्र मंगशे सावंत हे गंभीर जखमी झाले. यावरून तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.