पुर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलासह एकाला कोयता व दगडाने मारहाण

0
239

दि.३(पीसीबी): जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन अल्पवयीन मुलगा व त्याचा मित्र यांना सहा ते सात जणांच्या टोळक्याने कोयता, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही घटना गुरुवारी (दि.1) सुसगाव येथील पारखेवस्ती येथे रात्री घडला आहे.
याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलाने फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अविनाश चौगुले, रोहन पवार, ओमकार पाटील, संतोष धनावत व इतर 3 ते 4 जण यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र पृथ्वीराज मुरकुटे हे पायी जात असताना आरोपी तेथे आले. यातील अविनाश याचे पृथ्वीराज याच्या आत्याच्या मुलाशी भांडण झाले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी पिर्यादी व त्याच्या मित्राला कोयता, दगड व लाथाबुक्क्यांनी मारहा करत जखमी केले. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात मारहाण व बेकायदा शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.