पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीतील घट हे आर्थिक मंदीचेच संकेत

0
914

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – अमेरिकेपासून जगातील अनेक देशांमध्ये दीर्घकाळापासून मंदीची भीती निर्माण झाली आहे तर, अलीकडेच करोना लॉकडाऊनमधून बाहेर आलेल्या चीनच्या अर्थव्यस्थेलाही धक्के बसत आहेत. मात्रभारतीय अर्थव्यवस्था सुरळीत वाटचाल करत आहेत, पण अलीकडच्या एका सिग्नलने तज्ज्ञांना सतर्क झाले आहे. अर्थशास्त्रज्ञा पुरुषांच्या अंडरवेअरच्या विक्रीच्या ट्रेंडद्वारे देशातील अर्थव्यवस्थेतील मंदीचा अंदाज लावू शकतात. मात्र, याचा विचार करून सर्वसामान्यांचा गोंधळ उडू शकतो.देशात अलीकडेच अंडरवियरच्या विक्रीत घट झाली आहे.

इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार अंडरवेअर उत्पादक कंपन्यांची यादी वाढली तर त्यांची विक्री कमी झाली आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते जेव्हा महागाईमुळे लोकांचे बजेट बिघडते तेव्हा ते आधी अंतर्वस्त्रासारख्या जीवनावश्यक वस्तूंची खरेदी पुढे ढकलतात. सर्व विभागांमध्ये अंतर्वस्त्रांच्या विक्रीत लक्षणीय घट झाली असून शहरांबरोबरच ग्रामीण भागातही अंतर्वस्त्रांची विक्री कमी झाली आहे.

पुरुषांच्या अंडरवेअरची विक्री कमी झाली
गेल्या वर्षीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अंडरवेअरच्या विक्रीत घट नोंदवली गेली असून अंडरवेअरच्या घटत्या विक्रीमुळे कंपन्यांसमोर अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. या कालावधीत जॉकी ब्रँड अंडरवेअर उत्पादन कंपनी पेज इंडस्ट्रीजचा महसूल आणि विक्री देखील कमी झाली आहे. घटत्या विक्रीमुळे त्यांच्याकडे जादा इन्व्हेंटरी जमा झाली आहे.

विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील महागाई रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेपार नोंदवली गेली आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडते आणि त्यामुळे ग्राहकांच्या भावनेवर परिणाम होतो.

अंडरवेअर आणि अर्थव्यवस्थेचे काय कनेक्शन
तज्ज्ञांच्या मते पुरुषांचं अंडरवेअरच्या विक्रीत घट अर्थव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही. लोकांना महागाईचा फटका बसत असल्याची ही लक्षणे आहे. अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे माजी प्रमुख ॲलन ग्रीनस्पॅन यांनी अर्थव्यवस्थेचा अंदाज घेण्यासाठी पुरुषांच्या अंडरवेअर इंडेक्सची निर्मिती केली होती.

यानुसार जेव्हा एखाद्या देशात पुरुषांच्या अंतर्वस्त्रांच्या विक्रीत घट होते, तेव्हा ते अर्थव्यवस्थेतील मंदीचे लक्षण आहे. २००७ ते २००९ दरम्यान अमेरिकेत आलेल्या आर्थिक मंदीपूर्वी अंडरवेअरच्या विक्रीत घट झाली होती. ग्रीनस्पॅनने १९७० च्या दशकात पुरुषांच्या अंडरवेअर इंडेक्सचा सिद्धांत मांडला होत. त्यांनी म्हटले की पुरुषांच्या अंडरवेअरच्या विक्रीचे आकडे एक महत्त्वाचे आर्थिक सूचक आहेत. अंडरवेअर एक खाजगी कापडे आहे आणि ते लपलेले असते. अशा परिस्थितीत जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट होते, तेव्हा माणूस सर्वात आधी अंडरवेअर खरेदी करणे बंद करतो