पुनावळे मधून 44 लाखाचा गुटखा जप्त

0
297

पुनावळे, दि. २१(पीसीबी) : पुनावळे मधील गायकवाड वस्ती येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून 44 लाख वीस हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. ही कारवाई रविवारी (दि. 19) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास करण्यात आली.

महेंद्रकुमार कान्हाराम परमार (वय 25, रा. हिंजवडी. मूळ रा. राजस्थान) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी परमार याने शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी साठवणूक करून ठेवला. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली असता रविवारी दुपारी पोलिसांनी कारवाई करून 44 लाख वीस हजार 49 रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला तसेच 22 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत