पुनावळे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विरोधात राज ठाकरे यांना निवेदन

0
306

पुनावळे, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल विरोध करण्यासाठी आज सर्व नागरीकांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली.

आम्ही पुनावळे (पिंपरी चिंचवड) येथील रहिवासी असून काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पुनावळे येथे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणी संदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल खूप चिंतेत आहोत .

सध्या पुनावळे परीसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेले असून ते अजूनही सुरूच आहे . सुमारे १ लाखाहून अधिक नागरिक सध्या पुनावळे येथे राहत आहेत , आपण त्यांची येथे राहण्याची असलेली आवड याला कारणीभूत येथील असलेले नैसर्गिक वातावरण , शेजारी असलेले हिंजवडी आय टी पार्क आहे . परंतु तेच आता घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पा मुळे खराब होण्याची वेळ आमच्यावर येत असताना दिसत आहे.
यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण हा प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सोसायटीज पासून खूप कमी अंतरावर (२०० – ४००मीटर) आहे .

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प जेव्हा २००८ साली मंजूर केला गेला त्यावेळी एवढ्या प्रमाणात नागरीकरण नव्हते परंतु आता मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प, शैक्षणिक संस्था , रुग्णालये येथे उभारले गेले आहेत आपण
प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे या सगळ्या गोष्टीवर गंभीर परिणाम होऊ शकतो .

सोबतच नैसर्गिक रित्या लाभलेल सौंदर्य नष्ट होईल कारण प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा जंगलाच्या अगदी कडेला लागून उभारण्याचा विचार करण्यात आलेला आहे ज्यामुळे भली मोठी नैसर्गिक हानी होईल . जवळच असलेल्या जल सिंचनाच्या माध्यमातून देखील नागरिकांना दुषित पाण्याचा सामना करावा लागेल .

प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा पश्चिम दिशेला आहे. वारे नेहमी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि म्हणून याचा परिणाम पुनावळेसोबतच वाकड , ताथवडे , हिंजवडी आय टी पार्क , मारुंजी , मुंबई पुणे महामार्गासारख्या आधीच विकसित असलेल्या परिसरात देखील होण्याची दाट शक्यता आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त हे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प डिसेंबर २०२३ पर्यंत सुरु करण्यास उत्सुक आहेत पुनावळे काटे वस्ती जंगलातील २२ हेक्टर परिसरात पसरलेली लाखो झाडे कचरा डेपोसाठी तेडली जातील आणि पाणी, माती आणि हवेच्या प्रदुषणामुळे आमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होईल हे मात्र खरे !

तरीही या सर्व बाबी लक्षात घेता पुनावळे व जवळपास असणार्या सर्व नागरिकांचा विचार करून पुनावळे परिसरात येणारा ह्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प रद्द करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करावेत जेणेकरून सर्व नागरीकांच आयुष्य धोक्यात येणार नाही .

शहर नियोजन शहरीकरणाबाबत तुमच्या दूरदृष्टी अवघा महाराष्ट्र परिचित आहे . तसेच तुम्ही आणि मनसे या विषयात जातीने लक्ष द्याल हि पुनावळेकरांची खूप मोठी अपेक्षा तथा विश्वास आहे.
पुढील दोन ते तीन दिवसात निर्णय घेऊ असे राजसाहेब बोलले. आज भेटीच्या वेळी पुनावळे , हिजवडी , मारुजी , ग्रामस्थ त्याच प्रमाणे मनसे सरचिटणीस रणजित शिरोळे , गणेश सातपुते , उपशहरअध्यक्ष – राजु सावळे , उपविभाग अध्यक्ष विशाल साळुखे , मारुजी शहरअध्यक्ष सतोष कवडे या उपस्थित होते