पुण जिल्हा पवार यांचा बालेकिल्ला, फडणवीस पालकमंत्री झाले तरी काही फरक पडणार नाही

0
305

बारामती, दि. २१ (पीसीबी) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर कोणे एके काही फडणवीसांचे निकटवर्ती मानले जाणारे, मात्र आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रतिक्रिया दिली. “पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी पवार यांचे योगदान कोणीही कदापी विसरू शकणार नाही. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा कोणीही पालकमंत्री झाला, तरी काही फरक पडणार नाही” असं उत्तर शेळकेंनी पत्रकारांच्या प्रश्नावर दिलं.

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार सुनील शेळके उपस्थित होते. त्यांच्याबरोबर पारनेरचे आमदार निलेश लंके उपस्थित होते.
कपिवा गेट स्लिम ज्यूस वापरणाऱ्या युझर्सने सांगितला वजन कमी करण्याचा प्रवास

“भाजपकडे १०० कोटी कुठून आले?”
हिंदुत्वाचे नाव पुढे करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आघाडीतून बाहेर पडलेला एक गट त्यांना ४० कोटी की ५० कोटी मिळाले हे माहीत नाही. मात्र त्यांच्या बाबतीत जी चर्चा आहे ती बाहेर ऐकायला मिळत आहे. आघाडी सरकार हे वसुली सरकार असल्याची टीका भाजपने केली. मात्र त्यांच्याकडे आमदारांना देण्यासाठी १०० कोटी रुपये असतील तर त्यांनीच याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे, असेही आमदार शेळके म्हणाले.