पुण्यात मिरवणुकीत झेंडा फडकवताना तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू; दुर्घटनेमुळे परिसरातील मिरवणुका रद्द

0
72

पुणे, दि. २२ (पीसीबी) – पैगंबर जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत झेंडा फडकवताना हाय टेन्शन वायरला झेंडाचा लोखंडी रॉड लागून त्यात एका युवकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना शहरातील वडगाव शेरीमधील भाजी मंडई परिसरात रविवारी सकाळी साडेदहा वाजता घडली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. अभय वाघमारे (वय-१७) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरीमध्ये आज मिरवणुक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये अनेकजण सहभागी झाले होते. वडगाव शेरी भाजी मंडई परिसरात ही मिरवणुक आली. त्यावेळी अभय वाघमारे व त्याचे मित्र हे डीजेवर चढून झेंडा फडकवत होते. अचानक झेंड्याचा विजेच्या तारांना स्पर्श झाला.
डीजेवर चढलेल्या तरुणांना विजेचा जोरदार शॉक लागला. त्यात अभय वाघमारे हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाला. तर इतरांवर उपचार करण्यात येत असल्याचे चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले. घडलेल्या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.