पुणे, दि. ७ (पीसीबी) : राज्यात हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होण्याची चिन्हे आहेत. मात्र, शिवसेना महाविकास आघाडीत असल्याने मनसे शिवसेनेसोबत जाणार की महाविकास आघाडीत येणार यावरही तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, पुण्यात मनसेच्या मदतीला महाविकास आघाडी धावून आल्याने मनसेचे इंजिन महाविकास आघाडीला जोडले जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
बुधवारी महापालिका आयुक्त आणि मनसेचे कार्यकर्ते यांच्यात झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे घटक पक्ष आज गुरुवारी मनसेसोबत महापालिकेत निषेध आंदोलन करणार आहेत.