पुण्यात तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड

0
275

मुंबई दि. २५ (पीसीबी) – तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. पुण्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तानाजी सावंत हेदेखील त्यांच्यासोबत बंड करून आसामला गेले. त्यानंतर आता राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी बालाजीनगर परिसरातील तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात येत आहे. शिवसैनिक त्याठिकाणी पोहोचले त्यावेळी पोलीस घटनास्थळी नव्हते. हाताच शिवसेनेचा झेंडा घेऊन यावेळी कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. गद्दार असे कार्यालयाच्या काचांवर लिहून या काचा फोडण्यात आल्या आहेत. शिवसैनिकांनी यावेळी तानाजी सावंत यांच्याविरोधात घोषणाबाजीही केली.

जो शिवसेनेशी गद्दारी करेल, त्याला असेच उत्तर मिळणार. बंड करणाऱ्यांना अजूनही वेळ आहे. त्यांनी परत यावे, अन्यथा त्या सर्वांची अशीच अवस्था होईल, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले आहेत. सत्ता असताना शिवसेनेत आहे. तो काही मूळ शिवसैनिक नाही, अशी तानाजी सावंत यांच्यावर टीका करण्यात आली आहे. सुरुवात आता पुण्यातून झाली आहे. ते लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरेल. त्यामुळे वेळीच परत या, असे आक्रमक शिवसैनिक म्हणाले.