पुण्यात आणखी एक आयटी पार्क होणारं !उद्योगमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

0
1

परिसरातील वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे आयटी कंपन्यांचे स्थलांतर होत आहे. ते रोखण्यासाठी पुण्यात नवीन आयटी पार्क उभारण्यात येणार आहे. हा आयटी पार्क पुरंदर येथे उभारण्याचे पाऊल पडले आहे. याप्रकरणी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे. महसूल विभागाची प्रक्रिया पूर्ण होताच आयटी पार्कसाठीची प्रस्तावित जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (एमआयडीसी) हस्तांतरित करून प्रकल्पाची कार्यवाही जलदगतीने केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात वाढती वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे काही मोठ्या आयटी कंपन्यांचे स्थलांतर होत असल्याची बाब विधानसभेत मांडण्यात आली. कंपन्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत आणि चांबळी परिसरातील गायरान जमीन आयटी पार्कसाठी हस्तांतरित करण्याबाबत सरकारची भूमिका काय, अशी लक्षवेधी सूचना आमदार विजय शिवतारे यांनी विधानसभेत मांडली होती. त्यावर उद्योगमंत्री सामंत यांनी ही माहिती दिली.

याप्रकरणी आमदार विजय शिवतारे आणि राहुल कुल यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यांनी म्हटले होते की, पुण्यातील हिंजवडी हे आयटी हब म्हणून उदयास आले आहे. या परिसरातील वाहतुकीवर प्रचंड ताण असून पाच-पाच तास होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे उद्योजक हैराण झाले आहेत. अपुऱ्या पायाभूत सुविधा आणि इतर समस्यांमुळे बर्कले, नाईस, क्रेडिट स्युईस, ल्युमिडेक्स यांसारख्या अनेक बड्या कंपन्यांनी हिंजवडीमधून परराज्यात स्थलांतर केले आहे. या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने आणखी कंपन्या इतरत्र स्थलांतरित होण्याच्या विचारात आहेत. हे स्थलांतर रोखण्यासाठी व रोजगारवृद्धीसाठी पुण्याच्या बाजूला पुरंदर तालुक्यातील दिवे, कोडीत व चांबळी येथे आयटी पार्क प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावित आयटी पार्कसाठीची जमीन ही शासकीय गायरान असल्याने भूसंपादनाची समस्या नसून त्यासाठी खर्चही होणार नाही. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी २४ जुलै २०२४ रोजी आणि उद्योगमंत्र्यांनी ३ एप्रिल २०२५ रोजी बैठका घेऊन महसूल विभागाकडून जमीन हस्तांतर करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिलेले आहेत. मात्र अद्याप याबाबत महसूल विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हा विषय तातडीने मार्गी लावण्यासाठी भूमिका घ्या