पुण्यातून चोरलेल्या 21 दुचाकी बीड जिल्ह्यात लंपास

0
51

देहूरोड पोलिसांनी ठोकल्या दोघांना बेड्या

देहूरोड, दि.५ (पीसीबी)

पुणे जिल्ह्याच्या विविध भागातून चोरी केलेल्या दुचाकी दोन चोरट्यांनी बीड जिल्ह्यात लंपास केल्या. या चोरट्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 21 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

आकाश शंकर जाधव (वय 24, रा. चिखली. मूळ रा. धाराशिव), आशुतोष नानासाहेब घोडके (वय 23, रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस देहूरोड बाजारपेठ येथे गस्त घालत असताना स्वामी चौकात दोघेजण चोरीची दुचाकी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार संशयावरून पोलिसांनी एक दुचाकी ताब्यात घेतली. दुचाकीवरील दोघांकडे दुचाकी बाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी देहूरोड चिखली, भोसरी एमआयडीसी, निगडी, भोसरी, दिघी, चिंचवड, सिंहगड परिसरातून 21 दुचाकी चोरल्याचे सांगितले. पोलिसांनी या सर्व दुचाकी बीड जिल्ह्यातून हस्तगत केल्या. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.