पुणे, दि. २ (पीसीबी) – महाराष्ट्रामध्ये प्रथमच पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी या हॉस्पीटलमधे रोबोटीकच्या सहाय्याने करण्यात येणाऱ्या गुडघ्यावरील सांधेरोपण शस्त्रक्रियेत सिरॅमिकचा सांधा वापरण्यात आला. ही शस्त्रक्रिया पुण्यातील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांनी यशस्वी केली.
या विशेष शस्त्रक्रियेबद्दल बोलताना डॉ. नरेंद्र वैद्य म्हणाले की गुडघ्यावरील सांधेरोपण शस्त्रक्रियेत आमूलाग्र बदल होत आहेत . या शस्त्रक्रिया अधिक यशस्वी व्हाव्यात म्हणून जगभरातील तज्ज्ञ संशोधनात्मक अभ्यासाद्वारे विविध प्रयोग करत असतात. शस्त्रक्रिया यशस्वी होण्यासाठी अत्याधुनिक तंत्रप्रणाली , सुसज्ज थिएटर, निष्णात सर्जनची टीम व त्याच बरोबर उत्तम दर्जाचा इम्प्लंट असणे गरजेचे असते.
आजकाल गुढगेदुखी ही तरुण वयातसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते. त्यांच्यामध्येही संधिवाताचे प्रमाण वाढते आहे अशावेळी वय कमी आहे म्हणून रुग्ण शस्त्रक्रिया टाळण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा प्रयत्न करतात. तरुण वयात सर्जरी केल्यास पुन्हा काही वर्षांनी सांधेरोपण सर्जरी करावे लागेल म्हणून ते दुखणे सहन करत राहतात त्याचा दैनंदिन जीवनातील हालचालीवर परिणाम होतो या दृष्टीने इम्पलंटचे आयुर्मान वाढण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू असतात. त्यादृष्टीने या इम्पलंटचा फायदा होणार आहे.
गुढघ्याच्या संधीरोपण शस्त्रक्रियेत वापरण्यात येणारा कृत्रिम सांधामधे वापरण्यात येणाऱ्या धातू ऐवजी आता सिरॅमिकचे मटेरियल वापरण्यात आले आहे . या चे वैशिष्ट्य असे की हे मटेरियल रुग्णाच्या आंतरप्रकृतीतील उतीशी साधर्म असणारे असल्यामुळे शरीराशी सहज जुळवून घेण्यास मदत करणारे आहे पर्यायाने अलर्जी असणाऱ्या रुग्णांसाठी हा एक उत्तम पर्याय होयू शकतो. इन्फेक्शनचा धोकही कमी होऊ शकतो ,बऱ्याच वेळा शास्त्रोक्रीयोतर सीटी स्कॅन , एमआरए सारख्या तपासण्या करताना आर्टिफॅक्ट येतात त्यामुळे निदानात बाधा येऊ शकते परंतु या इम्पालंटमुळे क्लियरीटीमधे कोणताही फरक पडत नाही. तसेच रुग्णाच्या शस्त्रक्रियोत्तर हालचालीत सुधारणा , सहजता येऊ शकते व नी सोसायटी स्कोरच्या अभ्यासानुसार रुग्णास वेदना कमी व दैनदिन कामात सुलभता येते असे दिसून आले आहे. इम्पलंटचे आयुर्मानही इतर इम्पालंटच्या तुलनेत अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
एकंदरीत खुब्याच्या शस्त्रक्रियेबरोबरच गुढघ्याच्या शस्त्रक्रियेतही सिरॅमिक इम्पलंटचा पर्याय उपलबद्ध झाल्याने रुग्णांना मुख्यत तरूण वयातील रुग्णांना याचा अधिक फायदा होऊ शकतो.