पुण्यातील फातिमा साबूवाला ठरली महाराष्ट्राची सौंदर्यवती

0
506

-लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांचा महिलांचा आत्मविश्वास वाढविणारा उपक्रम

पिंपरी,दि. १ (पीसीबी) – महिलांच्या अंगभूत कलागुणांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित लॉलीपॉप एटरटेनमेंट या संस्थेच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२३” पर्व ५ चे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड थरमॅक्स चौक येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून ३० सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. यामध्ये पुण्यातील फातिमा साबूवाला (पुणे) गृहिणीने प्रथम क्रमांकाचा मुकुट आणि रोख एकवीस हजार रुपयांचे बक्षीस पटकावले.

द्वितीय पारितोषिक स्नेहल शिंदे (हडपसर)आहार तज्ञ यांनी द्वितीय क्रमांकाचा मुकुट आणि रोख सतरा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक स्नेहा कोठारी (अहमदनगर) संगणक अभियंता यांनी तृतीय क्रमांक चा मुकुट आणि रोख पंधरा हजार रुपये बक्षीस देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक निकिता भालेराव (पुणे) परिचारिका आणि अर्पिता शिवनेकर (मावळ) विद्यार्थी यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहभागी सर्वांना सोन्याची नथ, पैठणी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. परीक्षक म्हणून सोनाली पानसरे, तृप्ती पवार, शुभांगी तरस आणि निलिमा अवसरमल यांनी काम पाहिले. ग्रूमिंग नरेश फुलेलू आणि रागिनी मोराळे यांनी केली. वेशभूषा आणि केशरचना मेघाली लोखंडे मोटे यांनी केली. प्रमुख पाहुणे लिटिल एंजल स्कूल किवळेचे संस्थापक आणि अध्यक्ष मच्छिंद्र तरस उपस्थित होते. स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंट संचालक संजय जोगदंड, सूत्र संचालन आर. जे. बंड्या यांनी केले तर नितीन साळुंके आणि राज जोगदंड यांनी विशेष आभार मानले. शिल्पा मगरे गाडेकर, डिंपल ठक्कर, मासूम युसुफ आणि अविनाश धोत्रे यांनी संयोजनात सहभाग घेतला.