पुण्यातील पत्रकार असल्याचे सांगत नागपुरात दोन तोतया पत्रकारांनी केली फसवणूक

0
351

नागपूर, दि. १६ (पीसीबी) – पुण्यात पत्रकार असल्याचे भासवून नागपूरच्या दोन तोतया पत्रकारांनी फसवणूक केल्याचे प्रकरण ऐन अधिवेशनाच्या वेळी उघडकीस आले आहे. याप्रकरणी पुणे येथील येरवडा वृत्तवाहिनीचे विनोद कुमार यमुना ओझा (वय ५४ रा. पुणे ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकाराने पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

सविता साखरे कुळकर्णी आणि नरेंद्र वैरागडे अशी या तोतया पत्रकारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोघेही दिल्लीतील एका वृत्तवाहिनीचे राज्यातील प्रमुख असल्याची बतावणी केली. त्या माध्यमातून त्यांनी अनेक कार्यक्रम आणि विधिमंडळाची पास तयार केल्याची माहिती समोर आली.

याबाबत वृत्तवाहिनीला माहिती मिळताच, त्यांनी नागपुरात विचारपूस केली. त्यावेळी ते बनावट पास तयार करून फिरत असल्याचे त्यांना कळले. यावेळी दोघांचीही नावे समोर आली असता, त्यांनी पुण्यात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार नागपुरातील व्यक्तीशी निगडीत असल्याने त्यांनी ती सदर पोलिस ठाण्यात वर्ग केल्यावर त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.