पुण्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य चे कन्नडिकांविरोधात आंदोलन

0
228

कर्नाटक मध्ये केलेल्या उच्छादाला स्वराज्य चे प्रत्युत्तर – डॉ. धनंजय जाधव (प्रवक्ते, स्वराज्य)

कर्नाटक सरकारच्या गाड्यांची सोडली हवा.

पुणे,दि.०७(पीसीबी) – कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणाऱ्या व MH च्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी खेड शिवापूर टोल नाक्यावर छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

कर्नाटकातील वाहनांवर स्वराज्य संघटनेचे स्टिकर लावण्यात आले तसेच गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदविण्यात आला.

यावेळी स्वराज्य संघटनेचे स्वराज्य प्रवक्ते, डॉ. धनंजय जाधव ,निमंत्रक गणेश सोनवणे, विनोद परांडे, अमोल वीर, द्वारकेश जाधव, किरण राजपूत, विक्रम कदम, सुमित दरंदले, दादाराव बोबडे, आकाश लांडगे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.