पुण्यातील कसबा व चिंचवड मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा जाहीर.

0
250

चिंचवड, दि.१० (पीसीबी) -शिवसेना प्रमुख मा उद्धवजी ठाकरे, मा.अजितदादा पवार व काँग्रेस नेते यांची संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा. मनोजदादा आखरे आणि महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संभाजी ब्रिगेडच्या दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेऊन आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला असुन तशा सूचना मा. मनोजदादा आखरे आणि मा.सौरभदादा खेडेकर यांनी आम्हाला दिल्या आहेत. त्यामुळे आज शिवसेना संपर्क प्रमुख सचिनजी अहिर आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार,सह संघटक मनोज गायकवाड यांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कसबा आणि चिंचवड येथील उमेदवारी अर्ज मागे घेऊन महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

तरी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार संभाजी ब्रिगेड दोन्ही ठिकाणी आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी ताकदीने काम करेल.यावेळी प्रविण कदम, श्रीकांत गोरे, सदाशिव लोभे, अप्पासाहेब चादवडे, राम क्षीरसागर, तेजस गवई, यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले, उप शहर प्रमुख रोमी संधू यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.