पुण्यातील एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये बी.एड प्रवेश प्रक्रिया सुरू

0
4

दि. ११(पिसीबी)– एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत कार्यरत असलेल्या एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे (पिनकोड 411038) येथे शैक्षणिक वर्ष 2026-2028 साठी बी.एड प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी लवकरात लवकर अर्ज करावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

महाविद्यालयात बी.एड नियमित दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यासाठी 50 जागा उपलब्ध आहेत. तसेच बी.एड विशेष शिक्षण (लर्निंग डिसॅबिलिटी) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रमही उपलब्ध असून त्यासाठी 30 जागा आहेत. हा अभ्यासक्रम आरसीआय (RCI) मान्यताप्राप्त आहे. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.

या प्रवेशासाठी MAH-CET तसेच ELCT परीक्षा अनिवार्य आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी 2026 असून परीक्षा दिनांक 27 ते 29 मार्च 2026 दरम्यान होणार आहे. अधिक माहितीसाठी आणि ऑनलाइन अर्जासाठी उमेदवारांनी cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधता येईल –
बी.एड नियमित: 9923917066 / 9422943736
बी.एड विशेष शिक्षण (LD): 9822848090 / 7767019639

तसेच प्रवेशासंबंधी शंका निरसनासाठी व्हॉट्सअॅप गटात सहभागी होण्यासाठी दिलेला क्यूआर कोड स्कॅन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.इच्छुकांनी ही सुवर्णसंधी साधत शिक्षण क्षेत्रात आपले करिअर घडवण्यासाठी तत्काळ अर्ज करावा, असे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.