पुण्याच्या सिद्धांत पाटीलचा अमेरिकेत मृत्यू

0
439

दि. 6 ऑगस्ट (पीसीबी) – नोकरीनिमित्त पुण्यातून अमेरिकेला गेलेल्या सिद्धांत पाटील यांचा मोंटानातील ग्लेशिअर नॅशनल पार्कमध्ये बुडून मृत्यू झाला आहे. चार आठवड्यांनंतर त्यांचा मृतदेह बचाव पथकाला सापडला आहे.सिद्धांतच्या पुण्यातील कुटुंबीयांनी अमेरिकन अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती दिली आहे. पाटील सात मित्रांसह ६ जुलै रोजी रॉकी माऊंटनमधील उद्यानात फिरावयास गेले होते. तेथे ते हिमस्खलन खाडीत पडले. सिद्धांत पाटील मूळचे महाराष्ट्रातील असून सध्या सॅन जोसे येथे वास्तव्यास आहेत. तेथे ते एका कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करत होते. ते आणि त्यांचे काही मित्र तळ्याजवळ फिरत असताना तोल जाऊन ते तळ्यात पडले. ग्लेशियर नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चार आठवड्यांच्या शोधानंतर, रेंजर्सनी सिद्धांत विठ्ठल पाटीलचा मृतदेह बाहेर काढला.

मित्रांच्या म्हणण्यानुसार पाटीलने घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे आणि गियरदेखील जप्त करण्यात आले आहेत. एका व्यक्तीने घाटाच्या खाली मृतदेह पाहिल्याची माहिती दिली. रेंजर्सनी तेथे जाऊन तपासणी केली असता तो मृतदेह सिद्धांत पाटीलचा असल्याचे स्पष्ट झाले. सिद्धांत पाटील जिवंत असतील अशी त्याच्या कुटुंबीयांची आशा होती. परंतु, ही आशा आता धुळीस मिळाली आहे. त्याचे काका प्रितेश चौधरी यांच्या माहितीनुसार पाटील यांनी उद्यानात फिरताना आईला फोन केला. त्याने आईला सांगितले की, तो इतर सहा भारतीय मित्रांसह तीन दिवस उद्यानात होता आणि ते सर्व सहलीचा आनंद घेत होते. अपघाताच्या दोन तासआधी, त्याने आईला मेसेजही केला होता. त्यानुसार तो तीन दिवसांत सॅन जोसला परतणार आहे. सिद्धांत एकुलता एक मुलगा होता. २०२० पासून तो अमेरिकेत राहात होता. तो कॅलिफोर्निया विद्यापीठ, लॉस एंजेलिस मधून एमएस करण्यासाठी तेथे गेला होता. पाटीलचे वडील गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागातून निवृत्त झाले असून त्यांची आई गृहिणी आहे.